Homeबातम्याअकोल्यात भीषण अपघात; कार थेट पुलावरून कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू

अकोल्यात भीषण अपघात; कार थेट पुलावरून कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू

Newsworldmarathi Akola: शहरातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वाडेगाव बाळापुर रस्त्यावर घडली आहे. कन्हैयासिंग ठाकूर (वय-५४), विशाल भानुदास सोलनकर (वय-४५) आणि सुनील शर्मा (वय-४५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महिटिनुसार, अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपटा येथील असणाऱ्या नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. वाडेगावकडून बाळापूरकडे जात असताना मध्यरात्रीच्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदत केली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवले असून, त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मरण पावलेले व्यक्ती हे सर्वजण बाळापुर शहरातील रहिवासी आहेत.

दरम्यान, चारचाकी गाडी थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कार जवळपास ५ ते ६ वेळा पलटी होत खाली कोसळली. या वाहनातील तीन लोकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मांडवा कुपटा येथील ग्रामस्थांनी गाडीमध्ये असलेल्या जखमींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, यातील तिघांचा वाटेतचं मृत्यू झाला होता. या प्रकरणात बाळापुर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास केला जात आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments