Newsworldmarathi Pune: Ajit Pawar । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींची कबुली दिली आहे. या योजनेअंतर्गत काही अपात्र महिलांना लाभ मिळाल्याचे उघडकीस आले असून, त्यांची नावे हटवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचं होते. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
या योजनेत २,२०० पेक्षा अधिक अपात्र सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारने या अपात्र लाभार्थ्यांची नावे हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अजित पवार यांनी म्हणाले की, “या योजनेची अंमलबजावणी करताना काही चुका झाल्या आहेत. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल.” राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि योग्यतेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. योजनेचा लाभ खरोखर गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार यांनी पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना दिलेल्या शस्त्र परवान्याविषयी भाष्य केलं. ते म्हणाले, पुणे शहरामध्ये अशाप्रकारे कोणकोणाला शस्त्र परवाना देण्यात आला आहे, हे तपासले जाईल.
मधल्या काळात मी बीडचा पालकमंत्री झालो तेव्हा अशा तक्रारी आल्या तेव्हा तिथल्या एसपींनी फेर आढावा घेतला. अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. 2020 ते 2023 कोणाकोणाला लायसन्स दिली गेली, याचा तपास करु. असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.


Recent Comments