Homeपुणेपुण्यात महास्कॅम...! नारायण पेठेतील ज्वेलर्समधून कर्मचाऱ्याने लांबवले साडेचार कोटींचे दागिने

पुण्यात महास्कॅम…! नारायण पेठेतील ज्वेलर्समधून कर्मचाऱ्याने लांबवले साडेचार कोटींचे दागिने

Newsworldmarathi Pune: शहरातील प्रसिद्ध सराफ बाजार असलेल्या नारायण पेठेतल्या नीलकंठ ज्वेलर्समध्ये मोठा अपहार उघडकीस आला आहे. दुकानात सेल्समन म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक नगरकर (३५, रा. कोथरूड) याने तब्बल चार कोटी ५८ लाख रुपयांचे दागिने गुपचूप लंपास केल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात रविवारी (१ जून) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वासघाताचं सोनं!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरकर हा नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्मसन म्हणून काम करत होता. त्याच्याकडे अंगठी, सुवर्ण नाणी, वेढणी या आभूषणांची विक्री करणाऱ्या दालनाची जबाबदारी होती.

साधारणतः १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत त्याने चार कोटी ५८ लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे मोजणीअंती स्पष्ट झाले. तपासासाठी पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. दोन हजार २६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेढण्या, तसेच दोन हजार ४२६ ग्रॅम वजनाची ९४ सुवर्ण नाणी (कॉइन) असा ऐवज चोरीस गेला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

एवढा ऐवज लंपास
१८० सोन्याच्या वेढण्या – २,२६२ ग्रॅम
९४ सुवर्ण नाणी (कॉइन) – २,४२६ ग्रॅम
एकूण अंदाजे ₹4.58 कोटींची चोरी

पोलिसांची कारवाई सुरू
नीलकंठ ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन डांगे (३७) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments