Homeपुणेलग्नात सोने-गाडी दिलं, तरी नवऱ्याकडून फक्त वेदनाच ! सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ,...

लग्नात सोने-गाडी दिलं, तरी नवऱ्याकडून फक्त वेदनाच ! सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ, महिला आयोगही मूग गिळून गप्प?

Newsworldmarathi Pimpri: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिंचवड येथे पत्रकार परिषद घेऊन ऐश्वर्या आदित्य हुलावळे यांनी स्वतःच्या वैवाहिक आयुष्यातील छळ, मारहाण व पोलिस-प्रशासनाच्या उदासीनतेचा भडिमार करत धक्कादायक आरोप केले. लग्नात मोटार, १५ तोळे सोने आणि महागड्या वस्तू दिल्यानंतरही सासरच्यांनी सतत पैशांसाठी त्रास दिला, असा त्यांचा दावा आहे. या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार देऊनही त्याची दखल न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

वडील अपंग असूनही सोने-गाडी दिलं : ऐश्वर्या हुलावळे
ऐश्वर्या हुलावळे आणि त्यांच्या आई-वडीलांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत. ऐश्वर्या हुलावळे यांनी म्हटले आहे की, आदित्य हुलावळे यांच्याशी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी भोसरीत लग्न झाले. सासरकडच्यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे एक चारचाकी वाहन, १५ तोळे सोन्याचे दागिने व अन्य सुख सुविधेच्या सर्व वस्तू दिल्या गेल्या. वडील ८१ टक्के अपंग असतानाही त्यांनी जमीन विकून वस्तू दिल्या.

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी पती, सासू, दीर, आजोबा, मावस सासू, मावस सासरे यांनी छळ करण्यास सुरुवात केली. वारंवार होत असलेले अत्याचार, शिवीगाळ, धमक्या देत असल्याने अखेर या संदर्भात डिसेंबर २०१७रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलीस ठाण्यातही ‘तू जर तक्रार दाखल केली, तर आम्ही तुला नांदवणार नाही’, अशी धमकी सासरच्याकडून दिली गेली. भाजीमध्ये उंदीर मारण्याचे
औषध दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तक्रार अर्ज करूनही वेळोवेळी पोलिसांकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही.

सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर २४ डिसेंबर २०१८ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद करताच ३ जानेवारी २०१९ रोजी मी माहेरी गेले. त्यानंतर पतीकडून घटस्फोट बाबत पत्र देण्यात आले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे मार्च २०२५ मध्ये तक्रार अर्ज केला. मात्र, त्यांच्याकडून अर्जाची दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलीस प्रशासनही मदत करीत नसल्याचा आरोप ऐश्वर्या हुलावळे यांनी यावेळी केला.

लग्नानंतर दोन महिन्यांतच छळ सुरू
२८ फेब्रुवारी २०१७ रोजी भोसरीत ऐश्वर्यांचं लग्न झालं.
सासरकडचं मागणं मान्य करून वडिलांनी जमीन विकून गाडी आणि १५ तोळे सोने दिलं.पण केवळ दोन महिन्यांतच माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ सुरू झाला.

पोलीस आणि महिला आयोगाकडूनही दुर्लक्ष!
डिसेंबर २०१७ मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
गुन्हा नोंदवला गेला २४ डिसेंबर २०१८ रोजी, पण तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष.मार्च २०२५ मध्ये महिला आयोगाकडेही अर्ज, पण काहीच कारवाई नाही, असा आरोप.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments