Homeपुणेशालेय वाहनांची तपासणी मोहीम; वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आरटीओचे आवाहन

शालेय वाहनांची तपासणी मोहीम; वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आरटीओचे आवाहन

Newsworldmarathi Pune : नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने शालेय वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सोमवारी यासंदर्भात आदेश जारी करत वाहनधारकांना आपली वाहने तपासणीसाठी सादर करण्याचे आणि योग्यता प्रमाणपत्र तातडीने नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

आरटीओने स्पष्ट केले आहे की, शाळा आणि महाविद्यालयांमार्फत तसेच खासगी वाहनधारकांकडून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अशा सर्व वाहनांची तांत्रिक तपासणी करून त्यांना अद्ययावत फिटनेस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वाहन तपासणीसाठी दिवे येथील आरटीओ कार्यालयात येऊन संबंधित वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागणार आहे. तपासणीसाठी वाहनांची नोंदणी, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र, परवाना, फिटनेस अशा सर्व कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे.

आरटीओने ही तपासणी प्रक्रिया साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वाहनधारकांना गैरसोय होणार नाही. त्यामुळे संबंधितांनी विलंब न करता लवकरात लवकर तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

ही मोहीम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असेही आरटीओने स्पष्ट केले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments