Homeपुणेअसा लोकनेता पुन्हा होणे नाही...

असा लोकनेता पुन्हा होणे नाही…

Newsworldmarathi Team भाग्यश्री जाधव : आज, 3 जून 2025 रोजी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील नाथ्रा गावात जन्मलेल्या मुंडेंनी कोणताही राजकीय वारसा नसतानाही संघर्षातून आपल्या वक्तृत्व, इच्छाशक्ती आणि जनसंपर्काच्या जोरावर राजकारणात सर्वोच्च स्थान मिळवले. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास होता. ऊसतोड मजुरांच्या भागाचा विकास, भाजपला ग्रामीण भागात पोहोचवणे, आणि जनतेसाठी कायम लढा देणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते. त्यांनी भाजपला गावागावात नेले. शरद पवारांसारख्या नेत्यांविरुद्ध आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. फडणवीसांच्या राजकीय प्रवासातही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वगुणामुळेच युतीला मजबुती मिळाली. 3 जून 2014 रोजी त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील एक तडफदार नेता हरपला.

2009 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून येत गोपीनाथ मुंडे यांनी दिल्ली गाठली. 2014 मध्येही त्यांनी लोकसभेची पुनरावृत्ती केली. मात्र, 1990 ते 1995 हा काळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्पा मानला जातो. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांविरुद्ध प्रभावी भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे घनिष्ट कौटुंबिक संबंध होते. त्यांनीच महायुती स्थापन करत रामदास आठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी यांना एकत्र आणले.

Oplus_131072

मुंडे यांची राजकीय दृष्टी इतकी दूरगामी होती की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या तरुण नेत्यावर त्यांनी विश्वास दाखवला. प्रमोद महाजन यांच्यासोबत त्यांनी फडणवीसांना कमी वयात आमदारकीचं तिकीट मिळवून दिलं. 2013 मध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी गडकरी-मुंडे गटात रस्सीखेच सुरू होती. गडकरी गटाने सुधीर मुनगंटीवार यांना तर मुंडे गटाने फडणवीसांना पाठिंबा दिला. मुंडेंच्या ताकदीमुळे फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले आणि पुढे 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. गोपीनाथ मुंडेंचे राजकीय योगदान आजही भाजपच्या यशाच्या मुळाशी आहे

आज, 3 जून 2025 रोजी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या छोट्याशा गावात 12 डिसेंबर 1949 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कोणताही राजकीय वारसा नसतानाही, आपल्या प्रभावी वक्तृत्व, प्रबळ इच्छाशक्ती आणि जबरदस्त जनसंपर्काच्या बळावर त्यांनी राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले.
गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर उच्चशिक्षण अंबाजोगाईतील महाविद्यालयात बी.कॉम. पर्यंत झाले. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नाथ्राचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली. 1978 मध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि 1980 मध्ये रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, तसेच भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदही भूषवले.

1985 मध्ये अपयश आलं तरी 1990 ते 2009 पर्यंत ते सलग आमदार राहिले. रेणापूर मतदारसंघ 2009 मध्ये नष्ट झाल्यानंतर त्यांनी परळीमधून यश मिळवले. ऊसतोड मजुरांच्या भागाचा विकास करणे, आणि भाजपसारख्या शहरकेंद्री पक्षाला ग्रामीण भागात पोहोचवणे, हे त्यांच्या कार्याचे मोलाचे योगदान मानले जाते. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments