Homeपुणेबकरी ईदनंतर काळाची झडप ! पिंपरीचा २२ वर्षीय इरफान विमान अपघातात गमावला,...

बकरी ईदनंतर काळाची झडप ! पिंपरीचा २२ वर्षीय इरफान विमान अपघातात गमावला, कुटुंबीयांचा आक्रोश

Newsworldmarathi Pune : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा टेकऑफनंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिंपरी-चिंचवडच्या संत तुकारामनगर येथील २२ वर्षीय इरफान शेख, जो एअर इंडियाचा कॅबिन क्रू मेंबर होता, याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह २४२ जण होते, यापैकी केवळ एक प्रवासी वाचला. या अपघाताने इरफानच्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

इरफान गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियात कार्यरत होता. सुरुवातीला तो डोमेस्टिक फ्लाइट्सवर आणि नंतर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर कॅबिन क्रू म्हणून काम करत होता. मूळचा साताऱ्यातील मेढा येथील असलेले शेख कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून पिंपरीत स्थायिक आहे.

इरफानच्या कुटुंबात आई-वडील, मोठा भाऊ, आजी-आजोबा आहेत. नुकताच बकरी ईद साजरी करण्यासाठी तो घरी आला होता, आणि कुटुंबासह आनंदाचे क्षण घालवून परतला. मात्र, त्याच्या जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

विमान मेघानीनगर परिसरातील डीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले आणि जमिनीवर २४ जणांचा मृत्यू झाला. एकूण २६५ जणांचा या अपघातात बळी गेला.

इरफानचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीय अहमदाबादला रवाना झाले असून, डीएनए तपासणीनंतरच ते सुपूर्द केले जाईल. अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी सांगितले की, एकमेव वाचलेल्या प्रवाशावर उपचार सुरू आहेत. इरफानच्या निधनाने पिंपरीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments