Newsworld Pune : मा. अजित पवार यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मोठा उत्साह व्यक्त करण्यात आला. मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आनंद साजरा केला.
या कार्यक्रमाचे आयोजन युवक उपाध्यक्ष करण गायकवाड आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केले होते. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दादांच्या यशाचा आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला.
पर्वती मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय यशाबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास गतीमान होईल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास संतोष नांगरे यांनी व्यक्त करण्यात आला.