Newsworldmarathi Pune: शहराला पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला आणि वरसगाव धरणातून रविवारी रात्री ७ नंतर एकूण २८,९०० क्यूसॅक वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदी पात्र दुथडी भरून वाहू लागली असून, पाणी रस्त्यांवर आले आहे. भिडेपूल रविवारी दुपारीच पाण्याखाली गेला आहे.
शहरासह चारही धरण क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव ही चारही धरणे ९१ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. यामुळे जलसंपदा विभागाने रविवारी रात्री मोठा विसर्ग सुरू केला. खडकवासलातून १८,३०० क्यूसॅक आणि वरसगावहून ९,५०० क्यूसॅक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी रात्री १२ पासून पुन्हा संततधार सुरु झाली असून, पावसाने सोमवार सकाळीपर्यंत उघडpeek घेतलेले नाही.
सूर्यदर्शन नाही, गारठा वाढला: रविवारी दिवसभर पावसाच्या रिपाटपातमुळे शहरात गारठा वाढला आहे. संपूर्ण शहरात थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत.
भिडेपूल यंदा उशिरा पाण्याखाली: दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाण्याखाली जाणारा भिडेपूल यंदा जुलैच्या अखेरीस पाण्याखाली गेला आहे.
नदीपात्रावर पोलीस बंदोबस्त गरजेचा: रविवारी नदीपात्रातून पाणी रस्त्यावर आले असतानाही अनेक नागरिकांनी वाहने चालवली. आज परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची गरज आहे. नागरिकांनी नदीकिनाऱ्यांवर गर्दी करू नये, असा इशाराही जलसंपदा विभागाने दिला आहे.
Recent Comments