Newsworldmarathi Pune: पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भव्य पाऊल उचलत शिंदवणे घाट परिसरात २२०० देशी वृक्षांची सामूहिक लागवड करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुले, स्वयंसेवी संस्था व ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
महाराष्ट्र राज्य वन विभाग, ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, द फॉरवर्ड फाउंडेशन आणि ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सौजन्य ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तर नियोजन द फॉरवर्ड फाउंडेशनने केले. या वृक्ष लागवडीच्या संवर्धनाची जबाबदारी ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन पार पाडणार आहे.
या उपक्रमात प्रमोद रासकर (वन संरक्षक), ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सामाजिक दायित्व विभागाच्या प्रमुख सीमा सुमन, प्रा. के. डी. कांचन, ऋतुजा कांचन सरपंच (उरुळी कांचन), सुदर्शन चौधरी (पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक), अलंकार कांचन, मयूर कांचन, संतोष आबासाहेब कांचन, सौ. शोभा महाडीक (सरपंच शिंदवणे), शिवाजी महाडीक, जगदीश महाडीक, विद्याताई यादव, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, संत यादव बाबा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, तसेच शिंदवणे, उरुळीकांचन ग्रामपंचायतींचे कर्मचारी वृंद आणि सागर बाळासाहेब कांचन यांची यंत्र सामुग्री असा उत्साहात सहभाग नोंदविला.
या हरित महायज्ञात ५०० हून अधिक पर्यावरणप्रेमींनी घाम गाळत सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक लोकसहभागातून उभारलेले हे हरित पाऊल भविष्यात शिंदवणे घाट परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहे.


Recent Comments