पुणे : गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) या दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. मिरवणूक संपेपर्यंत सर्व दुकाने व आस्थापनेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत घेण्यात आला असून, सार्वजनिक शांतता सुनिश्चित करणे हा उद्देश आहे. गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरासाठी आधी दिलेल्या सात दिवसांच्या सवलतीत बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत, १ सप्टेंबर (सहावा दिवस) ऐवजी आता ५ सप्टेंबर (दहावा दिवस) या दिवशी ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी असेल. हा दुरुस्त आदेश ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत जारी करण्यात आला आहे.


Recent Comments