जर्मनी: जर्मनीतही गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. तेथील मराठी व भारतीय मंडळांच्या वतीने गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून, सांस्कृतिक कार्यक्रम, आरती, भजन, कीर्तन आणि विविध उपक्रमांनी वातावरण मंगलमय झाले आहे.
स्थानिक मराठी व भारतीय कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले अशी माहिती जयंत करपे यांनी दिली .
पारंपरिक ढोल-ताशा, नृत्यस्पर्धा, बालगोपाळांसाठी खेळ आणि महिलांसाठी मेहंदी-रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
काही ठिकाणी गौरवशाली भारत या संकल्पनेवर देखावे साकारण्यात आले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परदेशात असूनही भारतीयांनी गणेशोत्सवाची परंपरा व संस्कृती जपली आहे. जर्मनीतील अनेक शहरांमध्ये बाप्पाच्या आगमनाने भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.


Recent Comments