पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा अत्यंत लोकप्रिय आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा 133 व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने पद्मनाभ मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे
यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून यामध्ये बाप्पा विराजमान झाला आहे. हे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे
दगडूशेठ हलवाई गणपतीचा गणेशोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. गावागावातून भाविक पुण्यामध्ये दाखल होत आहे. आत्तापर्यंत लाखो भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले आहे.


Recent Comments