Homeपुणेश्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे बावनकुळे यांच्याकडून कौतुक

श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे बावनकुळे यांच्याकडून कौतुक

Newsworldmarathi Pune: भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आणि समाजसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटलं की, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिजनला पुढे नेण्याचं काम श्रीनाथ भिमाले निष्ठेने आणि ताकदीनं करीत आहेत.”

बावनकुळे यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र २०२९, २०३५ आणि २०४७’ हे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन आहे, आणि त्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वामध्ये श्रीनाथ भिमाले यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हृदयात विशेष स्थान असलेले श्रीनाथ भिमाले हे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणारे एक असामान्य कार्यकर्ते आहेत.”

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments