Homeपुणेपुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित क्रांती मळेगावकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत २० ते ७९ वयोगटातील २५० महिलांनी सहभाग घेऊन विविध खेळांचा आनंद लुटला. यामध्ये संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात, उखाणे, चेंडूने ग्लास पाडणे, रस्सीखेच यांसह महिलांना विविध प्रश्न विचारून अतिशय विनोदी व खेळीमेळीच्या वातावरणात रंगतदार अशा स्पर्धांचा महिलांनी आनंद घेतला.

होम मिनिस्टर स्पर्धेत :
अॅड मयुरी देवकर – प्रथम क्रमांक – वॉशिंग मशीन
राणी चौधरी – द्वितीय क्रमांक – मोबाईल
अश्विनी निकम – तृतीय क्रमांक – मिक्सर
योगिता पिंपळगावकर – चौथे क्रमांक – हॅण्ड मिक्सर
सुरेखा तापडिया – पाचवा क्रमांक – कुकर
सोनाली जांभुळकर – उत्तेजनार्थ

अशा बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्याशिवाय सर्व महिलांना प्रत्येकी भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला.
प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले व महिला महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी अनुजा वाघोलीकर, प्राजक्ता ढवळे, वृषाली बागुल, प्रियांका मैत्राणी उपस्थित होत्या

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments