Homeपुणेमहेश नागरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी म्हणजे विश्वास, प्रगती आणि सहकाराची परंपरा

महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी म्हणजे विश्वास, प्रगती आणि सहकाराची परंपरा

Newsworldmarathi Team: भारतातील सहकार क्षेत्र हे सामान्य जनतेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या परंपरेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारी संस्था म्हणजे महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी पारदर्शक कार्यपद्धती, ग्राहककेंद्री सेवा आणि सहकारभावनेवर आधारित कामकाज या वैशिष्ट्यांमुळे बँकेने अल्पावधीतच ठोस विश्वास संपादन केला आहे.

महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी उद्देश केवळ बँकिंग सेवा पुरवणे एवढाच नसून, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. “सहकारातून प्रगती” या ब्रीदवाक्याला धरून बँकेने ग्रामीण व शहरी भागात ठोस कामगिरी बजावली आहे. ठेवी स्वीकारणे, कर्जपुरवठा करणे, महिला व लघुउद्योगांना आर्थिक पाठबळ देणे, शेती व शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी विशेष योजना राबवणे अशा विविध उपक्रमांद्वारे बँकेने व्यापक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या सोसायटीच्या महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही शाखा असून, आता गुजरातमध्येदेखील शाखा विस्तार होणार आहे महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सर्वसामान्य नागरिकाला

अर्थसहाय्य मिळवून देणे आणि त्यांच्यात बचतीचा मूलमंत्र रुजवणे या उद्देशाने याची निर्मिती झाली. बँकांच्या किचकट अटी आणि नियमांमुळे सर्वसामान्य माणसांना कर्ज मिळवणे मुश्किल तरत होते, अशा काळात कमीत कमी अटी आणि सोप्या प्रक्रियेने नागरिकांना कर्ज देण्यास महेश नागरीने सुरुवात केली. त्यादुष्टीने मगराज राठी यांनी कायमच सामान्यातील सामान्य लोकांना मदत मिळवुन देण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमाही जनमानसात तशीच तयार झालेली आहे.

छोट्या आकर्षक योजना
अवघ्या ३४ हजार रुपये भांडवलावर था सीसायटीने सुरूवात केली. अल्पावधीतच १०० कोटींच्या ठेवी जमा केल्या. आज संस्थेकडे २०० कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी आहेत भाजी विक्रेत्यापासून उद्योगपतीपर्यंत सर्वच सोसायटीचे खातेदार आहेत. मध्यमवर्गाला तसेच काबाडकष्ट करणाऱ्या वर्गालाही या सोसायटीचा आधार वाटतो. महेश नागरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे महत्त्वाचे वैशिष्ट्व म्हणजे छोट्या आकर्षक योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे. सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचा विकास साधणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न सोसायटी सातत्याने करते

पन्नास हजार खातेदार
को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कशी चालवावी यासंबंधी सरकारचे नियम आहेत. या नियमांचे काटेकोर पालन करून सामान्य माणसाची आर्थिक बाजू, बळकट करण्याचे काम सोसायटी प्रामुख्याने करते. जो माणूस रोज दोनशे ते पाचशे रुपये कमवती, अशा माणसाकडून बैंका इन्कम टॅक्स रिटर्नची मागणी करतात. जाचक नियमांमुळे सामान्य माणसांना स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करता येत नाही. त्यांच्या मदतीला महेश नागरी क्रेडिट सोसायटी याचून येते. ज्या ग्राहकांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे त्यांना ते फेडल्यानंार पुढे चार लाखांचे कर्ज दिले जाते. ज्याने चार लाखांचे कर्ज घेतले, त्याला आठ लाखांचे कर्ज देऊन त्याची वाढती गरज भागवली जाते. सामान्यांची एक आर्थिक ओळख निर्माण करण्यात सोसायटीने मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे आज या सोसायटीचे पक्षास हजार खातेदार आहेत

शैक्षणिक कर्जाची सुलभ तरतूद
सर्वसामान्य नागरिकांची गरज असणान्या गृहतारण, शैक्षणिक, सोनेतारण कर्ज यासाठी सोसायटीने सोप्या योजना तयार केल्या आहेत. येथील रिकरिंग योजना विशेष लोकप्रिय आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांची की पुढील वर्षी भरायची असेल तर आजपासूनच महिन्याला एक छोटी रक्कम भरण्याची सोय सोसायटीने केली आहे. या सोयीमुळे विद्यार्थ्यांला शैक्षणिक फीची मोठी रक्कम वेळेवर भरता येते. विम्याचे हप्ते तसेच मेडिक्लेमसाठीही अशीच योजना अमलात आणली जाते. आज या सोसायटीच्या सुखसागर नगर, टिळक रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, सोमवार पेठ या ठिकाणी शाखा आहेत, लवकरच पिंपरी-चिंचवड आणि गुजरातमधील सुरत या ठिकाणी नव्या शाखा उघडल्या जाणार आहेत.

महिलांकडून चालवली जाणारी सोसायटी
महेश नागरी सोसायटीचे आज २६ प्रतिनिधी काम करतात. सौसायटीमुळे त्यांना रोजगार मिळाला असून, बचतीचा संदेश देणारे दूत म्हणूनच ते काम करतात. महेश नागरी सोसायटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सगळे अधिकारी आणि काउंटरवर काम करणारे कर्मचारी या महिला आहेत.

राठी यांचे सामाजिक योगदान
सामाजिक कामालाही हातभार संस्थेचे सामाजिक कामदेखील मोठे आहे. अनाथांची माय म्हणून ज्यांची ओळख होती, त्या सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सतन या ठिकाणी पतसंस्थेतर्फे दरवर्षी भाऊबीज साजरी केली जाते. मकर संक्रांत आणि नवरात्र आदी कार्यक्रम देखील साजरे केले जातात. एखाद्या ग्राहकाला अचानक आर्थिक गरज पडल्यास मदतीसाठी सोसायटी धावून जाते आणि त्वरित अर्थसहाय्य करते

सर्वसामान्यांसाठी उपयुक्त धोरणे
सोसायटीत दररोज पन्नास रुपयांपासून ते पाच हजार रुपये जमा करणारे ग्राहक निर्माण झाले आहेत. येत्या काळात सोसायटीच्या माध्यमातून लघु उद्योगांना आर्थिक मदत देण्यासाठी यौजनता राबवली जाणार आहे. वर्षाला दीन याप्रमाणे शाखांचे जाळे देखील पुढील काही वर्षांमध्ये विस्तारले जाणार आहे. सोसायटीने लॉकर आणि कोअर बँकिंग प्रणाली सुद्धा विकसित केली आहे. तसेच डेली कलेक्शन देखील विकसित केले आहे. उत्तम टीम, भविष्यवेधी योजना, सर्वसामान्यांसाठी उपयुक्त धोरणे यामुळे महेश नागरी सोसायटीची ठेगवान घौडदौड सुरू आहे. आज सोसायटीच्या माध्यमातून छोट्यातील छोटा माणूस हा प्रगत झाला आहे. सर्वसामान्य कटुंबातील मुलांचे शिक्षण आणि करिअरची स्वप्रे पूर्ण झाली आहेत, सोसायटीच्या ख्यातीमुळे तिच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि गोवा येथील सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी पुण्यात आले होते.

बचतीबाबत समाजात उदासीनता असताना बचतीची सवय लावून आर्थिक शिस्त निर्माण करण्याचे महत्त्वाचे सामाजिक काम मगराज राठी यांनी महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह केडिट सोसायटीच्या माध्यमातून केले आहे. खातेदारांचा विश्वास आणि उत्तम सेवा याच्या माध्यमातून सोसायटीने सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.

आयएसओ मिळवणारी पहिली सोसायटी

मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नियमांचे पालन करून उत्तमरीत्या काम करणारी सोसायटी म्हणून महेश नागरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा मल्टीस्टेट फेडरेशनतर्फे गौरव करण्यात आला आहे सोसायटीला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाकडून बिझनेस आयकौन हा पुरस्कार नुकताच मिळाला आहे. आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून महेश नागरी क्रेडिट सोसायटीला मान मिळाला आहे या सगळ्या प्रवासाविषयी महेश नागरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक मगराज राठी म्हणतात, “आम्ही सुरुवातीपासूनच विकासाच्या मार्गावर आहोत, नियम आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. आम्ही अचानक झेप घेण्याऐवजी स्थिर, सातत्यपूर्ण वाढीचर विश्वास ठेवती, आम्ही आमच्या अंतर्गत व्यवस्था मजबूत करण्यासाठी सतत काम करती बैंकिंगमध्ये सेवेशिवाय विकायला तुसरे काही नसते. हे लक्षात घेऊन आम्ही सुरुवातीपासूनच उत्तम प्रकारची सेवा आणि पारदर्शक व्यवहार करत आहोत. दर्जेदार सेवेमुळेच नागरिकांचा आणि खातेदारांचा विश्वास मिळवण्यात आम्ही यशस्वी झाली लवकरच महेश नागरी क्रेडिट सोसायटीला तीस वर्षे पूर्ण होतील. पुढेही अशीच उत्तम आणि विश्वासार्ह सेवा सतत देत राहण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे

ते पुढे म्हणतात, आमची सोसायटी कदाचित अशा काही मोजक्या क्रेडिट को-ऑपपैकी एक आहे जी केवळ सुरक्षित कर्जे प्रदान करते. आम्ही रिअल इस्टेट किवा मोठ्या कंपन्यांना वित्तपुरवठा करत नाहीं आणि आम्ही कोणत्याही क्लायंटला कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देत नाही. आमचे लक्ष स्थानिक समुदायाच्या आणि दलित लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर आहे.

फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संचालक म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. त्यांच्या आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांची दमदार वाटचाल अखंडीतपणे सुरू आहे.

कष्टकऱ्यांच्या ध्येयांना पंख देण्यास कटिबद्ध

आधुनिक जगात वेग, ताणतणाद स्पर्धा आणि असुरक्षितता यांचा पगडा वाढत असताना, मानवाला खऱ्या शांततेची, आत्मिक बळाची आणि समन्वयाची गरज अधिक भासते. या पार्श्वभूमीवर ध्यानगुरु रघुनाथ येमुल (ध्यानगुरुजी) यांनी आपले आयुष्य अध्यात्म, विज्ञान, सामाजिक सेवा आणि दिव्यांग यांना आत्मनिर्भर करण्यासाठी अर्पण केले आहे. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे साधना, विज्ञान संशोधन, सेवा, संस्कार आणि समाजजागृतीचा एक अद्भुत पंगम आहे.

ज्या लोकांना बँकांचे व्यवहार परवडत नाहीत आणि त्र्यांचे उत्पन्न कमी आहे. अशा कष्टकरी वर्गाला पतसंस्था ही नेहमी आपली वाटत असते. या श्रेणीमध्येच गेल्या २८ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांची स्वप्रे पूर्ण करणाऱ्या महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा समावेश होतो. या सोसायटीने उत्तम सेवा आणि विश्वासाच्या जोरावर बचतीचा आदर्श घालून दिला आहे. २०० कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या या सोसायटीचे ५० हजार खातेदार आहेत. महेश नागरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिचे सर्व कामकाज महिलाच चालवतात सोसायटीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सदस्यांना आणि ग्राहकांना डिजिटलाइज्ड सिस्टीमच्या मदतीने चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न सोसायटी करत आहे. महेश नागरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची २० वर्षांची यशस्वी घोडतौड सुरू आहे. या संस्थेची धुरा सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक मगराज राठी सांभाळा आहेत.

महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सुरूवात १९२० साली सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या स्व. वनराज राठी बांनी केली. दिनांक १ ऑक्टोबर १९९८ रोजी विजया दशमी या शुभविवशी संस्थेचे काम सुरू झाले. सद्यस्थितीत राजेश राठी हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर मगराज राठी हे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments