Homeपुणेमल्हार सानपने दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली

मल्हार सानपने दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली

Newsworldmarathi Pune: सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पी एम डी टी ए (पुणे मेट्रोपॉलिटन डिस्ट्रिक्ट टेनिस असोसिएशन) यांच्या वतीने आयोजित दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मल्हार सानपने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. उपांत्य फेरीत मल्हारने आहान नारगोळकर यांच्याविरुद्ध चुरशीच्या लढतीत ५-४ (३) असा टायब्रेकमध्ये विजय मिळवला.

Advertisements

मल्हारने संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत मल्हारने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत आपली प्रतिभा सिद्ध केली. अंतिम सामन्यात मल्हारकडून आणखी सरस खेळाची अपेक्षा आहे. पी एम डी टी ए आयोजित ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे.

Advertisements

मल्हारच्या या यशाबद्दल त्याचे प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंनी अभिनंदन केले आहे. अंतिम सामन्यात मल्हार कोणत्या रणनीतीने खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments