Homeपुणेश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी

Newsworldmarathi Pune: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेसह महाराष्ट्र बांधकाम व्यावसायिक संघटना, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन तसेच कासार सोशल ग्रुपच्या वाटीने देखील यावेळी मदतीचा धनादेश आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी बोलताना ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले, “आपला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही खंबीरपणे उभा राहिलेला बळीराजा आज अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास आहे.”

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस श्री. अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, कासार सोशल ग्रुपचे चंद्रशेखर रासने, तुकाराम रासने, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष नितीन देशपांडे, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, मिलिंद केळकर, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे शिरीष राणे, दिलीप ठोंबरे आदी उपस्थित होते.

विविध संस्थांकडून लाखोंची मदत
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना पुणेच्या वतीने ५१ लाख ५१ हजार, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन यांच्या माध्यमातून ५ लाख, कासार सोशल ग्रुप पुणेच्या वतीने १ लाख २१ हजार, श्री. विठ्ठल दिनकर बोरकर यांच्या माध्यमातून १० हजार रुपये तसेच श्री. चंद्रशेखर तुकाराम झेडगे यांच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments