Homeपुणेजयराज ग्रुपचे संचालक डॉ.राजेश शहा यांना अमेरिकेच्या बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठाची डि.लीट पदवी...

जयराज ग्रुपचे संचालक डॉ.राजेश शहा यांना अमेरिकेच्या बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठाची डि.लीट पदवी प्रदान

Newsworldmarathi Pune: पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी, जयराज ग्रुपचे संचालक तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य इत्यादी सर्वच क्षेत्रात अग्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व, अन्नधान्याच्या व्यवसायात पंचक्रोशीमध्ये बासमती किंग म्हणून ओळख असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.राजेश शहा यांना अमेरिकेतील नावाजलेल्या बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठ, यूएसए’ कडून सामाजिक उद्योजकतेतील मानद डि.लीट ( बिझनेस मॅनेजमेंट अँड सोशल वर्क) विथ गोल्ड मेडल पुरस्काराने दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

दिल्ली येथे सदर पदवी प्रदान सोहळ्या प्रसंगी बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठच्या प्रतिनिधींनी बोलतांना डॉ.राजेश शहा यांना उद्देशून म्हंटले की, “आपल्या सामाजिक उद्योजकतेच्या क्षेत्रातील आपले अद्वितीय योगदान प्रेरणादायी ठरले आहे. मानवी जीवन व विविध समुदायांमधील परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपले प्रयत्न मोलाचे आहेत. डि.लीट पुरस्कार आपल्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रमाद्वारे सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीला आम्ही समर्पीत करीत आहोत.

व्यवसायात एक उंची गाठली असली तरी डॉ.राजेश शहा हे सामाजिक क्षेत्रात कायमच अग्रेसर असतात. त्यांच्याच प्रयत्नांतून पुणे येथे भारतातील पहिलेच भव्य दिव्य असे गुजरात भवन – जयराज स्पोर्ट्स & कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. त्याच्याच बाजूला गेल्या चार वर्षांपूर्वी PGKM विद्याधाम ही अत्याधुनिक सोयी सुविधा व क्रीडांगण असलेली बॅगलेस व डे स्कूल त्यांच्याच नेतृत्वात सुरु करण्यात आली आहे. डॉ.राजेश शहा यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी पेढामली, ता. विजापूर, जिल्हा मेहसाना (गुजरात) येथे ‘कंचन-हिरा आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर’ हे ६० बेड्सचे अत्याधुनिक हॉस्पिटल बांधले आहे. त्या ठिकाणी अत्यल्प किंवा मोफत दरात रुग्णांवर उपचार केले जातात.

आतापर्यंत डॉ.राजेश शहा यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे , त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकतेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी (पी.एचडी) देऊन सन्मानित केले आहे तसेच प्रतिष्ठित अशा फेअर बिझनेस प्रॅक्टीसेस करीता देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्काराने तीन वेळा सम्मानित करण्यात आले आहे. याशिवाय समाजरत्न, आदर्श व्यापारी त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार, व्यापार भूषण, राष्ट्रिय ऐकता पुरस्कार, कर्मवीर पुरस्कार, बेस्ट बिसनेसमॅन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिध्द उपक्रम लाडू-चिवडा चे ते जनक असून या उपक्रमासह डॉ.राजेश शहा यांचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदले आहे.

डॉ.राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ व या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन आहेत. तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून श्री पूना गुजराती बंधु समाज या ११० वर्षे पासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे सुवर्ण महोत्सवी वर्षाततील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिशयन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे गेल्या २५ वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. त्याचबरोबर जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार म्हणून ही ते कार्यरत आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या विविध पदांवर डॉ.राजेश शहा कार्यरत आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments