Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करणार आहे. ही पत्रकार परिषद राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांशी संबंधित असणार आहे. या परिषदेत निवडणुका कधीपर्यंत जाहीर केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून निवडणूक कार्यक्र माचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे. ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे


Recent Comments