Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या स्वाती चिटणीस यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभागातील विविध भागांमध्ये त्या सातत्याने भेटीगाठी घेत असून नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांचा भर असल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास वाढत आहे.

आज टिळेकर नगर परिसरात स्वाती चिटणीस यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत भेटीगाठी घेतल्या. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. या संवादादरम्यान स्वाती चिटणीस यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व विकासात्मक कार्याची माहिती नागरिकांना दिली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन स्वाती चिटणीस यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, तसेच प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि व्यापारी वर्गाच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीगाठी दरम्यान नागरिकांनीही आपल्या अपेक्षा, सूचना व समस्या मोकळेपणाने मांडल्या. स्वाती चिटणीस यांनी त्या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या या संवादात्मक आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे प्रभाग ४० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.


Recent Comments