Newsworldmarathi Pune: प्रभागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास ती तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणे हेच माझे ध्येय आहे, असे ठाम मत पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा माजी सभागृहनेते, पुणे महानगरपालिका श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी व्यक्त केले आहे. प्रभागातील कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही व्यक्तीला समस्या भेडसावत असल्यास माझ्या कार्यकर्ता कार्यालयातून तात्काळ संबंधित ठिकाणी कार्यकर्ता पाठवला जातो आणि त्या नागरिकाची अडचण सोडवली जाते, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.
श्रीनाथ भिमाले हे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून संघटन बांधणी, लोकसंपर्क आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यात त्यांचा विशेष अनुभव आहे. पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृहनेते म्हणून काम करताना त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
प्रभागातील नागरिकांसाठी कार्यकर्ता कार्यालय हे केवळ कार्यालय न राहता एक मदत केंद्र म्हणून कार्यरत आहे. लहान-मोठ्या तक्रारी असोत किंवा तातडीच्या समस्या, प्रत्येक बाबीवर तत्परतेने दखल घेतली जाते. या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये श्रीनाथ भिमाले यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
लोकसभा समन्वयक प्रभारी या नात्यानेही त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. कार्यकर्त्यांना बळ देणे, युवकांना जोडणे आणि जनतेशी थेट संवाद साधणे, या माध्यमातून त्यांनी प्रभावी नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे.
“जनतेच्या प्रश्नांसाठी माझे दार नेहमी खुले आहे. नागरिकांच्या सेवेसाठीच माझे राजकारण आहे,” अशी भूमिका श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केली असून त्यांच्या या कार्यशैलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Recent Comments