Homeपुणेभीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल; पुणेकरांची भीमथडीत खरेदीची लयलूट

भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल; पुणेकरांची भीमथडीत खरेदीची लयलूट

Newsworldmarathi Pune: अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भीमथडीच्या आजच्या 3 ऱ्या दिवशीही पुणेकरांचे पाय भीमथडीकडे वळले. ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांनी हाताने बनविलेले विविध पदार्थ खरेदी करताना पुणेकर दिसत होते. त्यामध्ये उन्हाळी पदार्थ, चिया सिड्स, गवतीचहा, पुदिना व आले पावडर, विविध मसाले, गावरान तूप, विवध प्रकारची लोणची, सिद्धटेकच्या प्रसिद्ध चमड्याच्या वस्तू आदी वस्तू खरेदी करताना पुणेकर दिसत आहेत. कर्जत–जामखेड विधानसभा मतदारसंघातील महिलांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनामुळे विविध महिला बचत गटांनी आपली उत्पादने सादर केली आहेत.

यामध्ये खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, कापड, कंदी पेढे, लाकडी बैलगाडी, काठवट , पोळपाट, बेलने, अगरबत्ती, धूप, खारमुरे , गुडीशेव, गावरान गाईचे तूप, हस्तकला वस्तू, शेतीपूरक व स्थानिक उत्पादनांचा समावेश आहे. त्याच बरोबर मटन थाळी, चिकन थाळी, काळा मसाला मधील चिकन, बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, उंबरहंडी, असे विविध खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. हीच बाब ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करत आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवतआहे.

आज बचत गटातील महिला लाखो रुपयात आर्थिक उलाढाल करून दाखवत आहेत. भीमथडी उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळाले असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

महिलांचा हा पुढाकार भविष्यातील उद्योजकतेसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
जास्तीत जास्त पुणेकरांनी भिमथडीला भेट द्यावी असें आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे www.bhimthadijatra.com या वेबसाईटवर पुढील 3 दिवसाचे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments