Newaworldmarathi Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संगम घडवणारा ‘गुरुजयंती’ हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतातील विविध संत, महंत आणि शक्तीपीठांच्या मूळ पादुकांचे दर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. समस्त भक्त मोहंबा रामदासी यांच्या विशेष प्रयत्नातून हा अभूतपूर्व सोहळा साकारला जात असून, श्रद्धाळूंना एकाच ठिकाणी अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे.
या सोहळ्यात प्रभु श्रीराम, श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज (औदुंबर), गजानन महाराज शेगाव, श्री सद्गुरू शंकर महाराज (धनकवडी), श्री रामदास स्वामी (सज्जनगड) तसेच पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन भक्तांना घडणार आहे.
हा धार्मिक कार्यक्रम गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी दत्त मंदिर, लोंढवाडी, मोशी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन, महाप्रसाद आणि सामूहिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड प्रभाग ७ चे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Recent Comments