Newsworldmarathi पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार विलास शेठ लांडे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांडे कुटुंबियांसोबत भोजनही केले. ही भेट राजकीय तसेच सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आगमनावेळी माजी आमदार विलास शेठ लांडे यांचे सुपुत्र विराज विश्वनाथ लांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आपुलकीच्या वातावरणात चर्चा झाली. भोसरी परिसरातील विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात विविध मुद्द्यांवर संवाद साधण्यात आला.
विलास शेठ लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात परिसराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली. त्यांच्या घरी झालेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ही स्नेहभावना आणि परस्पर आदराचे प्रतीक मानली जात आहे.
या भेटीमुळे भोसरी परिसरातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी काळात स्थानिक पातळीवर सहकार्य आणि संवाद अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.


Recent Comments