Newsworldmarathi Pune: वडगाव शेरी प्रभाग पाच मध्ये शिवसेनेने अनेक वर्ष प्रतिनिधत्व केले आहे. या प्रभागात शिवसेना (शिंदे गटाची) ताकद आहे. यामुऴे या प्रभागात किमान दोन जागा शिवसेना शिंदे गटासाठी द्यावेत अशी मागणी शिवसेना उपशहर संघटक उध्दव गलांडे यांनी पत्रकार परिषेदेत केली
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना युती असली, तरी जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला कमी जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चांमुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मधील शिवसैनिक (शिंदे गट)शिवसेना पुणे शहर उपशहर संघटक उद्धव गलांडे यांच्या संपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला छाया रविंद्र गलांडे, रमेश साळुंके, चेतन गलांडे, शाहरुख कुरेशी, विपुल दळवी, विकास गायकवाड आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गलांडे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत खांद्याला खांदा लावून समान कष्ट घेतले. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपातही शिवसेना शिंदे गटाला समान संधी मिळावी. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.
या मतदारसंघात भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक मतदान मिळत आले आहे. ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवकांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. येरवडा येथे शिवसेनेचे तीन नगरसेवक होते. तसेच खराडी, लोहगाव आणि वाघोली भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद भक्कम आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सहा प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी जागा देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळीवडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष हेमंत बत्ते यांनी सांगितले की, “वडगाव शेरी मतदारसंघात शिवसेना घराघरात पोहोचली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथे शिवसेनेने निवडणूक लढवणे आवश्यक आहे. त्यामुळे युतीत शिवसेनेला जागा सोडाव्यात.”
पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांनी सांगितले की, “वडगाव शेरीत निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने आहेत. संपूर्ण मतदारसंघात किमान प्रत्येक प्रभागात दोन जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.


Recent Comments