Newsworldmartahi Pune: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक २२ (क), काशेवाडी डायस प्लॉटमधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रभागातील नागरिकांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
अर्चना पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीची, प्रशासकीय अनुभवाची आणि प्रभागातील सातत्यपूर्ण विकासकामांची दखल घेत भाजपकडून त्यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रसंगी तुषार पाटील, उत्तमराव जाधव, रजनी जाधव, अमर जाधव यांच्यासह संपूर्ण पाटील परिवार उपस्थित होता. तसेच विक्रम खेनट, राहुल मोहिते, मनीषा गायकवाड, रेहान भाभी, मीरा बीघे, परवीन कोटालीया यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला.
नगरसेविका म्हणून कार्यरत असताना अर्चना पाटील यांनी प्रभागातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तत्काळ सोडविणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते.
कोरोना काळातही त्यांनी गरजू नागरिकांसाठी अन्नधान्य वाटप, औषधोपचार मदत, आरोग्यविषयक उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली. आगामी निवडणुकीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन अर्चना पाटील पुन्हा एकदा जनतेसमोर उभ्या राहिल्या असून, नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


Recent Comments