Homeपुणेप्रभाग क्रमांक ३८ मध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचाराचा श्रीगणेशा

प्रभाग क्रमांक ३८ मध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचाराचा श्रीगणेशा

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ३८ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार राणी भोसले, व्यंकोजी खोपडे, संदीप बेलदरे, अश्विनी चिंधे व प्रतिभा चोरगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. उमेदवारांनी प्रभागातील विकास, नागरी सुविधा व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३८ मधून भाजपला भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रभाग क्रमांक ३८ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ सद्गुरू शंकर महाराज मठाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी विधिवत पूजा-अर्चा करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी परिसरात भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून आली.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास आमदार भीमराव अण्णा तापकीर, बाबासाहेब मिसाळ, आबा शिर्डीमकर, माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे, रोहिदास बापू चोरगे, समीर धनकवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रभागातील विकास, नागरिकांच्या समस्या आणि भविष्यातील विकास आराखड्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी योजना राबवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर नागरिकांचा विश्वास असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३८ मधून भाजपला भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments