Homeभारततुमचा न्यूयरचा ट्रिप प्लॅन आहे?

तुमचा न्यूयरचा ट्रिप प्लॅन आहे?

Newsworld Team : नवीन वर्षे आलेकी थंडीची (winter season) चाहूल लागते. पावसाळ्यानंतर येणारा थंडीचा ऋतू बहुतेकांना आवडतो. गुलाबी थंडीमध्ये विविध ठिकाणी भटकंती करण्याची मजा काही औरच असते नाही? साधारण डिसेंबरच्या शेवटी किंवा या काळात अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. नवीन वर्षाची नियोजित ट्रीप असते.

Advertisements

सोनमर्ग (काश्मीर) – साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हलकी थंडी जाणवते. अशा परिस्थितीत, तुम्ही काश्मीरच्या निसर्गरम्य पर्वतरांगांना भेट देण्याचा विचार करू शकता. सोनमर्ग (Sonamarg) हे नवविवाहित जोडप्यांसाठी एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन (Honeymoon Destination) आहे. काश्मीरमधील पर्वतरांगा, बागा आणि विविध लहान-मोठी सरोवरं त्याच्या सौंदर्यात भर घालतात. काश्मीरमधला दल सरोवर (Dal Lake) जगप्रसिद्ध आहे. जर, तुम्ही जास्तचं नशीबवान असाल तर तुम्हाला या ठिकाणी हिमवर्षाव देखील अनुभवता येऊ शकतो.

बीर बिलिंग (हिमाचल प्रदेश) – दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे लोक 4 ते 5 दिवसांत बीर बिलिंगला (Bir Billing) भेट देण्याचा प्लॅन करू शकतात. हिमाचल प्रदेशमध्ये असलेलं हे सुंदर ठिकाण पॅराग्लायडिंग, ट्रेक सारख्या साहसी क्रीडा प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय याठिकाणी मेडिटेशन (Meditation) देखील करता येते. येथील ठिकाणांमध्ये तुम्हाला तिबेटी संस्कृतीची झलक पहायला मिळेल. 10 हजार रुपयांच्या खर्चामध्ये ही मिनी ट्रिप करू शकता.

मुक्तेश्वर (Mukteshwar) (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील मुक्तेश्वर (Mukteshwar) हे ठिकाण निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे जाऊन तुम्ही स्वच्छ आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. याशिवाय ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बाइकिंग, राफ्टिंगची देखील या ठिकाणी सुविधा आहे.

तीर्थन व्हॅली (हिमाचल प्रदेश) – निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅली (Tirthan Valley) एक सर्वोत्तम पर्याय आहे. या ठिकाणी स्वर्गीय वातावरणाचा अनुभव घेता येतो. तीर्थन व्हॅली हिमालय राष्ट्रीय उद्यानापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ट्राउट माशांसाठी (Trout Fish) लोकप्रिय आहे. जवळपास 10 हजार रुपये खर्च करून तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता

हृषीकेश (हरिद्वार) – धार्मिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हृषीकेश (Rishikesh) हे एक उत्तम ठिकाण आहे. गंगा घाट (Ganga Ghat) आणि कलात्मक मंदिरं हे याठिकाणचं प्रमुख आकर्षण आहेत. येथील मंदिरांमध्ये रात्री होणारी आरती पर्यटकांना आकर्षित करते. हृषीकेशपासून जवळ असलेल्या शिवपुरीलाही तुम्ही भेट देऊ शकता. तिथे राफ्टिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि बंजी जंपिंगचा आनंद घेता येतो. वाचा : 

औली (उत्तराखंड) – औली (Auli) हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकणारी सोनेरी हिरवळ आपलं मन प्रसन्न करून टाकते. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. हनिमूनसाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचा मुक्तपणे आनंद घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि खर्च दोन्ही वाढवावे लागतील.

रानीखेत (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये वसलेलं रानीखेत (Ranikhet) हे एक सुंदर हिल-स्टेशन आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडत असेल तर तुम्ही या नोव्हेंबरच्या सुट्ट्यांमध्ये रानीखेतला भेट देऊ शकता. याठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग, बाईक रायडिंग, राफ्टिंगचा देखील आनंद घेऊ शकता. रानीखेतमधील झुला देवी मंदिर (Jhula Devi Temple) देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही त्याला देखील भेट देऊ शकता.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments