Homeभारतमहिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; राणी भोसले यांच्यामुळे महिलांच्या हाताला मिळाले काम

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; राणी भोसले यांच्यामुळे महिलांच्या हाताला मिळाले काम

Newsworldmarathi Pune: प्रभाग ३८ च्या भाजपच्या अधिकृत उमेदवार राणी भोसले यांनी नगरसेविका म्हणून कार्यरत असताना महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय आणि प्रभावी काम केले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देत त्यांनी विविध उपक्रम राबवले. विशेषतः गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. या माध्यमातून अनेक महिलांनी घरबसल्या रोजगार सुरू केला असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात मोलाची भर पडली आहे.

यासोबतच राणी भोसले यांनी महिलांसाठी कागदी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. या वर्गांद्वारे पर्यावरणपूरक व्यवसायाची ओळख करून देत महिलांना रोजगारनिर्मिती कशा पद्धतीने करता येईल, याचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणानंतर अनेक महिलांनी प्रत्यक्ष काम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केले आहेत.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवत राणी भोसले यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला. त्यांच्या पुढाकारामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून समाजात त्यांचे स्थान अधिक बळकट झाले आहे. या उपक्रमांना महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सहभागही लक्षणीय राहिला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राणी भोसले यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments