Homeभारतविकासाचा संकल्प करून प्रभाग २१ च्या भाजपच्या उमेदवारांची प्रचार रॅली

विकासाचा संकल्प करून प्रभाग २१ च्या भाजपच्या उमेदवारांची प्रचार रॅली

Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ (मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क) परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार दौरा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. भाजप, आरपीआय (आठवले गट) आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार यांनी या प्रचार दौऱ्यात नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा संदेश दिला.

या प्रचार दौऱ्यात ‘अ’ गटातील वैराग प्रसन्नजीत भरत, ‘ब’ गटातील शिलिंकर सिद्धी अविनाश, ‘क’ गटातील चोरलेने मनीषा प्रविण आणि ‘ड’ गटातील भिस्मले श्रीनाथ यशवंत यांनी सहभाग घेतला. परिसरातील विविध भागांतून पदयात्रा काढण्यात येऊन घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधण्यात आला.

महर्षीनगर, अरिहंत गार्डन, गीतानंद सोसायटी, शनी मंदिर परिसर, संत नामदेव शाळा, दत्त मंदिर, एम.आर.ए. लॉज, युनिटी मित्र मंडळ, लालबाग परिसर, स्वामी समर्थ मंदिर, महात्मा फुले नगर गणपती मंडळ तसेच सफारी उद्यान आणि कॅन्टोनमेंट परिसरात हा प्रचार दौरा पार पडला. या ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे जोरदार स्वागत केले.

प्रचारादरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. केंद्र, राज्य आणि महापालिकेत समन्वय साधून विकासकामांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या प्रचार दौऱ्याला महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून भाजप उमेदवारांना प्रभाग २१ मधून सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांचा उत्साह आणि वाढता विश्वास पाहता भाजप कार्यकर्त्यांमध्येही जोमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments