Homeभारत‘सेवा हाच धर्म’ या ब्रीदवाक्याने राणी भोसले पुन्हा निवडणूक रिंगणात; नागरिकांचा पाठिंबा

‘सेवा हाच धर्म’ या ब्रीदवाक्याने राणी भोसले पुन्हा निवडणूक रिंगणात; नागरिकांचा पाठिंबा

Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ३८ मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार व माजी नगरसेविका राणी भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘सातत्य, संघर्ष आणि सामर्थ्य’ या त्रिसूत्रीवर आधारित त्यांचे कार्य आज प्रभागातील नागरिकांसाठी विकासाचा विश्वासार्ह आधार ठरत आहे.

राणी भोसले यांनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कामावर भर दिला आहे. महिला सक्षमीकरणाला त्यांनी विशेष प्राधान्य दिले असून विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन वाटप, रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्ग तसेच स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून आर्थिक बळकटी देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला. स्वच्छतेबाबत स्वतः पुढाकार घेऊन ‘आधी केले, मग सांगितले’ या तत्वानुसार त्यांनी काम करून दाखवले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य घटकांना सोबत घेऊन त्यांनी प्रभागात सामाजिक सलोखा निर्माण केला आहे.

आमदार, खासदार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राणी भोसले यांनी प्रभागातील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. “सेवा हाच आमचा धर्म आणि माणुसकी हाच आमचा मार्ग” या भूमिकेतून राणी भोसले आता नव्या जोमाने निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या कार्याची दखल घेत नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments