Newsworld Pune : राज्यातील सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून विरोधी पक्षनेता पद द्यायला हवे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. १९८० साली काँग्रेस पक्षाने विरोधकांच्या कमी जागा असल्या, तरी दिलदारपणा दाखवून ‘लीड ऑफ अपोझिशन’ दाखविला होता. त्यामुळे आताच्या सरकारनेही मनाचा मोठेपणा दाखवून राज्यात विरोधी पक्षनेता पद द्यायला हवे. मात्र, यावर ते काय निर्णय घेतात हा त्यांचा प्रश्न असल्याचेही त्या म्हणाल्या
मार्केटयार्ड येथील पक्ष कार्यालयात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या. नागरिकांकडून आमच्याकडे तक्रारी येत असतात. लोकांचा मतपत्रिकेवर विश्वास असेल, तशी त्यांची मागणी असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे. लोकशाही आहे ती लोकांसाठीच आहे. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्याला अर्थ नाही. ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घ्यायचा की नाही, यावर दोन दिवसांत निर्णय घेऊन पुढील पाऊल उचलले जाईल.
की कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला, तर परीक्षा रद्द केली जाते. मग जनतेमध्ये ‘ईव्हीएम’बद्दल आक्षेप असतील, तर ते दूर करणे हे निवडणूक आयोगाचे कामच आहे. विधानसभा निवडणूक निकालाबाबत मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा आहे. नागरिकांकडून आमच्याकडे तक्रारी येत असतात. लोकांचा मतपत्रिकेवर विश्वास असेल, तशी त्यांची मागणी असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे.