Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य प्रचार शुभारंभ करण्यात आला. या वेळी पक्षाच्या चारही उमेदवारांनी एकत्र येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रचाराच्या शुभारंभी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर पदयात्रा काढत परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. रस्त्यांच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे स्वागत करत होते. महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश लक्ष्मण कडे, सतीश मारकड, सपना अमोल वाघमोडे आणि विश्वास खुराट यांनी सहभाग घेतला. तसेच पक्षाचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि विकासकामांबाबत आपली भूमिका मांडली. “ज्या विश्वासाने नागरिक आमच्या पाठीशी उभे आहेत, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे उमेदवारांनी सांगितले.
एकूणच या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग ४० मधील निवडणूक वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार अधिक जोमात सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.


Recent Comments