Homeपुणेकल्पना मुळीक यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्पना मुळीक यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कल्पना उदयसिंह मुळीक यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साई दत्त मंदिरापासून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पदयात्रेदरम्यान कल्पना मुळीक यांनी घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन कल्पना मुळीक यांनी दिले.

प्रचारादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार देऊन कल्पना मुळीक यांचे स्वागत केले. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि विकासाभिमुख भूमिकेची नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली.

कल्पना मुळीक यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, तसेच स्वच्छ व सुरक्षित प्रभाग निर्माण करण्यावर भर दिला जाईल.

या पदयात्रेमुळे प्रभाग ४० मध्ये काँग्रेसच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले असून आगामी निवडणुकीत आपल्याला निश्चितच नागरिकांचे भरघोस समर्थन मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments