Homeभारतआधी डान्सबारमालकांना नाचविले; आता बेलापुरातील अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले; अतिरिक्त आयुक्त...

आधी डान्सबारमालकांना नाचविले; आता बेलापुरातील अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले; अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे ‘अॅक्शन मोड’वर

Newaworldmarathi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाच्या खुर्चीत बसतानाच, बेकायदेशीरपणे डान्सबार थाटणाऱ्या बारमालकांना अद्दल घडविल्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी पुन्हा एकदा अतिक्रमणांवर आपली नजर वळवली आहे. काही महिन्यांपूर्वी बेकायदा इमारतींवर बुलडोझर फिरवला आणि आता नियम तुडवून उभारलेल्या मदरशा आणि मशिदीवरही हातोडा उगारला आहे. महापालिका निवडणूक आटोपताच डॉ. गेठे आणि त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळीच कारवाईचा धडाका लावून बेलापूरमधील (सेक्टर १९) मधील मदरशा आणि मशिद पाडली.

विशेष म्हणजे, बेकायदा उभारलेल्या बांधकामाची एक वीटही ठेवायची नाही, अशी ताकीद देऊन डॉ. गेठे यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना घेऊन डोळ्यादेखतच कारवाई पार पाडली. अशा प्रकारे कारवाई करीत अतिक्रमण करणाऱ्यांना थारा नसेन, हाच इशारा यानिमित्ताने महापालिका प्रशासनाने दिला.

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील काही ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक कामे बांधकामे करण्यात आली आहेत. विशेषतः हॉटेल त्यातही डान्सबार हे बेकायदा असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली होती. या व्यावसायिकांना नोटिसा देऊनही काणाडोळा केल्यानंतर मात्र, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी एका रात्री शे-सव्वाशे हॉटेल पाडून डान्सबार मालकांना जागेवर आणले होते.

थेट बुलडोझर उभारून बांधकामे जमीनदोस्त करणाऱ्या डॉ. गेठेंविरोधात डान्सबारमालकांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाठ घेऊन नाराजी मांडली होती. त्यानंतरही आपला पवित्रा कायम ठेवून महापालिकेने कारवाईची मोहीम सुरूच ठेवली होती. त्यानंतरही बेलापूर आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना महापालिकेने कायम कारवाईचा धाक दाखवला. अशातच बलापूरमधील (सेक्टर १९) या भागातील मदरशा आणि मशिदवर कारवाई करीत, नियमबाह्य धार्मिक स्थळांवरही कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

“नवी महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा निवासी आणि व्यावसायिक मिळकतींवर नियमित कारवाई केली जाते. शहरात अशा प्रकारची बांधकामे होऊ नयेत, यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यवाही करीत आहोत. त्याचाच भाग म्हणून, मदरशा आणि मशिदीवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम कायमस्वरुपी राबविली जाते, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments