Newsworld solapur : मारकडवाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. या गावात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. गाव तुमचं आणि तुम्हाला जमावबंदी; हा कसला कायदा? असे म्हणत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
शरद पवार म्हणाले, आपल्या देशामध्ये ईव्हीएम पद्धत स्वीकारली त्यात बदल केला पाहिजे. मतदान झाल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात शंका आली. मग गावाने ठरवले की, गावात पुन्हा एकदा बॅलेट वर मतदान करायचं. मग पोलीसांनी त्याला विरोध का केला? तुमच्याच गावात जमावबंदी केली, हे कसे काय? जर गावाने ठरवले एखाद्या नव्या दिशेने जायचे तर मग विरोध का?
सध्या लोकसभेत मला अनेक खासदार भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव कुठे आहे त्यामुळे गावाचे अभिनंदन आहे राज्यात काही ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम च्या बाबतीत लोकांच्या मनात शंका निर्माण झाले आहे इतर देशांमध्ये ईव्हीएम वर मतदान होत नाही अमेरिकेने सुरुवातीला ईव्हीएमचा विचार केला पण नंतर तो बदलला आमच्या देशात पण ईव्हीएम वर शंका आम्हाला उपस्थित झाली आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या देशात चर्चेत आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या गावातून ईव्हीएम विरोधात लॉन्ग मार्च काढण्याच्या तयारीत आहेत.