Homeभारत‘दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते – रोहित पवार

‘दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते – रोहित पवार

Newaworldmarathi Mumbai : नरेश अरोरा यांच्या कॉन्ट्रॅक्टबाबत काहींची ठाम भूमिका होती; मात्र अजित पवार यांची भूमिका वेगळी असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. या प्रकरणी आपण कोणावरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसल्याचे स्पष्ट करत संबंधित घडामोडींची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. “दादांना उशीर का झाला, हे मी बोलून दाखवले; ते गाडीने गेले असते तरी दुर्घटना टळली असती,” असेही ते म्हणाले.

अजित पवार यांच्या अपघाताबाबत “हा अपघात की घातपात?” हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगत गेल्या काही महिन्यांत दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते, असा दावा पवार यांनी केला. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून अपघाताचे खरे कारण समोर यावे, अशी मागणी त्यांनी केली असावी, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएसोबत जाणार होता का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले असून सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्व मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments