Homeभारतघोषणा माझा दादा करणार होता : सुप्रिया सुळे

घोषणा माझा दादा करणार होता : सुप्रिया सुळे

Newaworldmarathi Pune : बारामतीच्या खासदार Supriya Sule यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेवती यांचा विवाह नागपूरमधील उद्योगपती कुटुंबातील सरंग लखानी यांच्याशी ठरल्याचे सांगितले जाते. सरंग हे उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र असून त्यांचा उद्योग समूह पाणी व्यवस्थापन व पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत आहे.

या पार्श्वभूमीवर लखानी कुटुंबाची सामाजिक व वैचारिक पार्श्वभूमी चर्चेत आली आहे. विशेषतः त्यांचे Rashtriya Swayamsevak Sangh (आरएसएस) सोबत संबंध आहेत का, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली. संघाचे सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्यासोबतचा अरुण लखानी यांचा एक छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर या चर्चेला उधाण आले. तथापि, यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही.

दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमात बोलताना सुळे भावुक झाल्या. “रेवती आणि सरंगचे लग्न माझ्या दादाच्या डोळ्यासमोर ठरले. या आनंदाची घोषणा माझा दादा करणार होता; पण आज तो आपल्यात नाही,” असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक Sharad Pawar यांच्या कुटुंबातील हा विवाह असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर या विवाहाची चर्चा सुरू असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments