Newaworldmarathi Pune: ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांना आज Ruby Hall Clinic येथून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयाचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर पवार यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील काही दिवस त्यांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरू राहणार असून, प्रकृतीनुसार ते लवकरच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील, असेही सांगण्यात आले.



Recent Comments