Newsworldmarathi Pune: सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरात उद्या गुरुवारी (१९ फेब्रुवारी) मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची मोठी गर्दी पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता; तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी ७ पासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
शिवाजी रस्ता जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – खंडुजीबाबा चौक – टिळक चौक – टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल
केळकर रस्ता
केळकर रस्त्यामार्गे अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकामार्गे बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सुरू असताना सोन्या मारुती चौकातून पुढे जाईपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक (समर्थ विभाग) मार्गे वळविण्यात येतील.
पुरम चौक
पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पुरम चौक – टिळक रस्ता – अलका टॉकीज चौक – एफ. सी. रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटक्या बुरुजाकडे जाणारी वाहतूक केळकर रस्त्यामार्गे सरळ पुढे वळविण्यात येईल. मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पूल – बालगंधर्वकडून इच्छितस्थळी जातील. मिरवणुका गाडगीळ पुतळा येथून पुढे जाईपर्यंत शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन – बालगंधर्व – टिळक पूलमार्गे वळविण्यात येईल. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – झाशी राणी चौक येथून इच्छितस्थळी जावे.



Recent Comments