Homeभारतअभियंत्याची आत्महत्या; हिंजवडीत हृदयद्रावक घटना

अभियंत्याची आत्महत्या; हिंजवडीत हृदयद्रावक घटना

पुणे : ऑनलाइन जुगाराच्या व्यसनातून आलेल्या नैराश्यामुळे २४ वर्षीय आयटी अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंजवडी आयटी पार्क परिसरात उघडकीस आली आहे. वानवडी येथील रहिवासी असलेला हा तरुण हिंजवडीतील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता. मंगळवारी पहाटे कंपनीच्या कॅन्टीनमधील स्वच्छतागृहात मोबाईल चार्जरच्या केबलच्या साहाय्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. बराच वेळ बाहेर न आल्याने सहकाऱ्यांनी पाहणी केली असता हा प्रकार समोर आला.

Advertisements

आत्महत्येपूर्वी संबंधित तरुणाने नातेवाईकांना पाठवलेल्या संदेशात ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगच्या आहारी गेल्याची कबुली दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जुगारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. आर्थिक ताण आणि नैराश्य यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून ऑनलाइन जुगाराच्या वाढत्या व्यसनाबाबत चिंतेची भावना व्यक्त केली जात आहे. हिंजवडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

Advertisements
Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments