Homeपुणेश्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी जयंत शहा; विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने...

श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी जयंत शहा; विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड

Newaworldmarathi Pune : श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी जयंत शहा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. गुजराती समाजाच्या कार्यालयात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व विश्वस्तांनी शहा यांची एकमताने निवड केली. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन शहा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष नितीन देसाई यांचे ८ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. देसाई यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले होते. अध्यक्षपदी निवड स्वीकारल्यानंतर जयंत शहा म्हणाले “संस्थेच्या परंपरेचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक बळ देण्यावर भर राहील, असे त्यांनी नमूद केले.” शहा हे जयराज ग्रुपचे संचालक असून ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, मुंबई (AIAI) तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर (MVIRDC) कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे सदस्य आहेत. जयंत शहा यांनी गुजरात येथे त्यांच्या वडिलांच्या जन्मगावी दहा वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ चॅरिटेबल आयुर्वेदिक कॅन्सर हॉस्पिटल उभारले. तसेच जयराज डेव्हलपर्सच्या माध्यमातून ते गेल्या २५ ते ३० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यात अनेक जैन मंदिरांच्या उभारणीत त्यांचा सहभाग आहे.

सन १९१३ मध्ये स्थापन झालेली श्री पूना गुजराती बंधू समाज ही पुण्यातील गुजराती समाजासाठी कार्यरत असलेली ११३ वर्षांची परंपरा असलेली प्रमुख संस्था आहे. सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांना जोडण्याचे काम संस्था सातत्याने करत आहे. संस्थेचे सहा हजारांहून अधिक आजीवन सभासद आहेत. कोंढवा येथील सुमारे चार एकर जागेवर गुजरात भवन, जयराज क्लब व स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे.

सुमारे २ लाख ५० हजार चौरस फूट परिसरात विकसित या सांस्कृतिक संकुलात विविध क्रीडा व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले जाते. शहा यांना सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव असून ते अनेक वर्षांपासून संस्थेशी निगडित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शहा यांनी व्यक्त केला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments