Homeपुणेनांदेडसिटी पोलिसांची मोठी कारवाई; तीन महिन्यांपासून फरार सराईत गुन्हेगार अटकेत

नांदेडसिटी पोलिसांची मोठी कारवाई; तीन महिन्यांपासून फरार सराईत गुन्हेगार अटकेत

Newaworldmarathi Pune: नांदेडसिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अखेर अटक करत मोठे यश मिळवले आहे. संबंधित आरोपीवर एमपीडीए (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज महेंद्र नांगरे (वय २९, रा. किरकटवाडी, हवेली) हा आरोपी गेल्या काही वर्षांपासून खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे, शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. त्याच्यावर सुमारे ०४ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात त्याची मोठी दहशत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि अनेकजण तक्रार देण्यासही घाबरत होते.

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग अजय परमार यांच्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस व प्रसाद राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजेश गायकवाड, पो. अंमलदार प्रथमेश गुरव, कैलास केंद्रे, अनिल बारड यांनी एम.पी.डी.ए.प्रस्ताव तयार करून मा. पोलीस आयुक्त, सो. पुणे शहर यांचेकडे पाठवीला होता.

प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. पो. हवा. संग्राम शिनगारे पो. अंमलदार स्वप्निल मगर, निलेश खांबे, प्रतिक मोरे यांनी भोर, पुणे ग्रामीण हद्दीतुन सदर आरोपीस ताब्यात घेतला.

आरोपी तीन महिन्यांपासून फरार होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, सोशल मीडिया तसेच विविध ठिकाणी सापळे रचून अखेर त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments