Homeपुणेबुधवार पेठेतील लॉज प्रकरणात एकटाच आरोपी; सीसीटीव्हीत अन्य कोणीही दिसले नाही :...

बुधवार पेठेतील लॉज प्रकरणात एकटाच आरोपी; सीसीटीव्हीत अन्य कोणीही दिसले नाही : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Newaworldmarathi Pune: शहरातील चर्चेत असलेल्या बुधवार पेठेतील लॉज प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले असून इतर कोणाचाही सहभाग आढळलेला नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. संबंधित आरोपीने लॉजमध्ये जाऊन आपत्तीजनक कृत्य केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

घटनेनंतर आरोपीला लॉजमधील कर्मचाऱ्यांनी पकडले असता त्याने “स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो आणि सोबत इतर पत्रकार होते” असा दावा केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या सीसीटीव्ही तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणात तो व्यक्ती एकटाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनेपूर्वी दोन तासांचा परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला असून त्यात अन्य कोणीही सहभागी असल्याचे आढळले नाही.

Advertisements

दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी फोन आले नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या “अनेक लोक उपस्थित होते, काहींना मारहाण झाली, काही जण पळून गेले” अशा चर्चांनाही त्यांनी फेटाळले. आरोपीला पकडताना काहींनी त्याला मारहाण केल्याचे मात्र त्यांनी मान्य केले.

रूपाली पाटील यांनी दिलेल्या अर्जात काही पत्रकारांवर सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र त्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही या सर्व मुद्द्यांची चौकशी सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सदर लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालतो का, याबाबतही पोलीस पडताळणी करत असून आतापर्यंत असे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तपास पुढे सुरू असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments