Homeपुणेजनसेवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव

जनसेवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव

Newaworldmarathi Pune: डॉ.बाबा आढाव यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त हमाल पंचायत,पुणे यांच्यातर्फे पहिला पुरस्कार जनसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेला देण्यात आला. सदर पुरस्कार मा. उल्हास दादा पवार, मा.शीलाताई आढाव व दि पुना मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया यांच्या हस्ते देण्यात आला.

पुण्यातील प्रतिष्ठित सामाजिक संस्था जनसेवा फाउंडेशनला, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानचिन्ह,शाल आणि माळ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ.विनोद शहा,खजिनदार डॉ.राजेश शहा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तसेच पुण्यातील उद्योग, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात ठसा उमटवणारे जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांना थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित ‘इंडो-थाई अचिव्हर्स समिट–२०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिष्ठित ‘भारत उद्योग पुरस्कार २०२६’ सन्मानित केल्याबद्दल हमाल पंचायत,पुणे तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

जनसेवा फाउंडेशन ही संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून निराधार मुलांचे शिक्षण, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करत आहे.गरीब/विभक्त कुटुंबांतील सुमारे २०० मुले येथे सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा स्वतंत्र सुविधांमध्ये राहत आहेत. त्यांना पूर्णपणे मोफत
साहाय्य दिले जाते आणि विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. येथे लहान वयात दाखल झालेल्या अनेक मुलांनी इथेच राहून त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ते चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत.

रस्ते, बस आणि रेल्वे स्थानकांवरून प्रौढ निराधारांना येथे आणले जाते आणि त्यांना निवास, भोजन व वैद्यकीय सेवा पुरवली जातात. नंतर त्यांचे शिक्षण, कौशल्ये आणि कल यांवर आधारित, त्यांना समाजात पुन्हा सामावून घेण्याच्या
उद्देशाने भरतकाम, शिलाई, कृत्रिम दागिने बनवणे, प्लंबिंगचे प्रशिक्षण इत्यादी योग्य व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेच्या या नि:स्वार्थ सेवेची दखल घेऊन, या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे.

पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना संस्थेचे डॉ.राजेश शहा म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. हा सन्मान आमच्या संस्थेच्या प्रत्येक दात्याला आणि स्वयंसेवकाला समर्पित आहे.”
हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १ जून २०२६ रोजी हमाल भवन मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. उल्हास दादा पवार व मा.शीलाताई आढाव, डॉ.विनोद शहा, डॉ.राजेश शहा, राजेंद्रजी बाठिया, हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरखभाऊ मेंगडे, सेक्रेटरी अंकुश अवताडे व हमाल पंचायतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार यांनी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments