Homeपुणेपत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके व सरचिटणीसपदी हिरा सरवदे

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके व सरचिटणीसपदी हिरा सरवदे

Newsworldmarathi Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी उमेश शेळके हे विजयी झाले, तर सरचिटणीसपदी ‘लोकमत’चे हिरा सरवदे यांची बिनविरोध निवड झाली, तसेच ‘सकाळ’चे सचिदानंद वाघमारे हे कार्यकारिणी सदस्यपदी विजयी झाले.

Advertisements

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या २०२६-२७ च्या वार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. २८) मतदान झाले. उपाध्यक्षपदी ‘टीव्ही ९’चे योगेश बोरसे आणि ‘पुढारी’चे किशोर बरकाले, खजिनदारपदी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे प्रसाद पानसे निवडून आले. चिटणीसपदी दैनिक भास्करचे राहुल देशमुख आणि ‘लोकसत्ता’चे संजय सपकाळे यांची निवड झाली.

कार्यकारिणी सदस्यपदी सुशांत राऊत (टीव्ही ९), ज्ञानेश्वर फड (प्रभात), उद्धव धुमाळे (लोकमत), अक्षय फाटक (नवराष्ट्र), तुषार झरेकर (पुढारी न्यूज), गोपाळ गुरव (महाराष्ट्र टाईम्स), दीपक होमकर (तरुण भारत), मिलिंद शुक्ल (प्रभात), मनोज मोरे (लोकसत्ता), सचिदानंद वाघमारे (सकाळ) यांचा विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. स्वप्नील जोशी यांनी कामकाज पाहिले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments