Homeपुणेना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून एसआयआर मोहिमेला गती; बीएलओंसमवेत घराघरांत मतदारांशी संवाद

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून एसआयआर मोहिमेला गती; बीएलओंसमवेत घराघरांत मतदारांशी संवाद

Newsworldmarathi Pune: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी SIR मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासह कोथरुड मधील घराघरांत भेटी देत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून भरलेले एसआयआर गणना फॉर्म स्वीकारून मोहिमेबाबत जनजागृतीही करण्यात आली.

Advertisements

या भेटीदरम्यान ना. पाटील यांनी मतदारांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगत; प्रत्येक मतदाराची माहिती अचूक आणि अद्ययावत राहणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष म्हणजे यावेळी चंद्रकांतदादांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत; ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नव्हते, अशा सर्वांना आवश्यक मार्गदर्शन करुन फॅार्म भरुन घेतले. तसेच, भरलेले फॉर्म तत्काळ स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया देखील यावेळी पार पडली.

“मतदार यादीतील अचूकता ही सशक्त लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक मतदाराचे नाव यादीत समाविष्ट असावे, कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडूनही या मोहिमेला ८ ॲागस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन आपला SIR फॉर्म वेळेत भरून बीएलओंकडे जमा करावा,” असे आवाहन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments