Homeपुणेइनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा पदग्रहण समारंभ उत्साहात

इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा पदग्रहण समारंभ उत्साहात

Newsworldmarathi Pune: समाजसेवा” ‘सामाजिक बांधिलकी आणि मैत्रीची परंपरा जपणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा पदग्रहण समारंभ 17 जुलै रोजी नुकताच पुणे येथे पार पडला ‘या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ दीपशिखा पाठक उपस्थित होत्या.त्यांच्या शुभहस्ते मीना राठोड यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

Advertisements

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी अध्यक्ष कल्पना बोरा यांनी मागील वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर करत क्लबच्या उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट मंगल वायकर यांनी क्लबचा गेल्या सोळा वर्षांचा प्रेरणादायी प्रवास प्रभावी शब्दात मांडला आणि विविध सभासदांचा त्यांच्या विशेष कार्यासाठी भेटवस्तू देऊन गौरव केला.

Advertisements

डॉ. दीपशिखा पाठक यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात असोसिएशनच्या प्रेसिडेंट विनूथा हरीश यांच्य*महिला सबलीकरण’ ‘सक्षमीकरण व सशक्तिकरण*या त्रिसूत्रीचा आपल्या प्रकल्पांद्वारेí प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्याचे आव्हान केले. तसेच इनरव्हीलच्या Grow and Flourish या थीम वरती मार्गदर्शन केले डॉ दीपशिखा पाठक यांच्या शुभहस्ते अध्यक्षपदी मीना राठोड, उपाध्यक्षपदी वृषाली शिरुडकर, सचिवपदी पूजा माळुंजकर, कोषाध्यक्ष माधुरी बोरा,आय एस ओ संगीता गोवळकर एडिटर वैशाली खुले यांचा पदग्रहण समारंभ झाला.

कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन मंजुश्री उपासनी यांनी केले तर आभार वृषाली शिरोडकर यांनी मांडले.हा पदग्रहण सोहळा एकूणच अविस्मरणीय ठरला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments