Homeपुणेराष्ट्रहित जोपासणारे विदयार्थी घडवणे हिच काळाची गरज" : आयएएस अधिकारी डॉ.सागर...

राष्ट्रहित जोपासणारे विदयार्थी घडवणे हिच काळाची गरज” : आयएएस अधिकारी डॉ.सागर डोईफोडे

Newsworldmarathi Pune: स्वातंत्र्य हि जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे पेलणारे तसेच राष्ट्रहित जोपासणारे विद्यार्थी घडवणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्रीनगरचे भारतीय प्रशासकिय सेवा अधिकारी सागर डोईफोडे
यांनी केले.

Advertisements

चाटे शिक्षिण समुहाच्याधनकवडी येथील चाटे पब्लिक स्कूल येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळा चाटे स्कूल चे माजी विद्यार्थी, श्रीनगरचे भारतीय प्रशासकिय सेवा अधिकारी डॉ सागर डोईफोडे यांच्यासह आशिष साबळे, रत्नाकर सोनवणे, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त विजयसिंह गायकवाड शिव व्याख्याते राहूल नलावडे, संस्थापक प्रा. फुलचंद चाटे मुख्याध्यापक नवनीत राजपाल व रणजीत जगताप, जाधव सर यांच्या उपस्थितीत मोठ्या . उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ देण्यात आली. देशभक्तीपर मनोगतं, नृत्य व विविध कलागुणं सादर करुन विद्यार्थ्यानी उपस्थितांची मने जिंकली.

Advertisements

प्रा. फुलचंद चाटे सरांनी आपल्या प्रास्ताविकात चाटे शिक्षण समुहाच्या चौफेर प्रगतीचा आढावा मांडताना देशाचे सर्वोत्तम
नागरिक, देशाचे नेतृत्व, सर्व क्षेत्रात आपली क्षमता सिध्द करणारे विद्यार्थी घडवण्याचे प्रयत्न सदोदीत सुरू असल्याचे सांगीतले.

डॉ डोईफोडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनातील धेय प्राप्तीसाठी आवश्यक असलेला मूलमंत्र दिला. तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. आभार प्राचार्य रणजीत जगताप यांनी मानले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments